Sunday, March 24, 2019

Post

धोंडी चम्प्या एक प्रेमकथा " चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न...



 "धोंडी चम्प्या एक प्रेम कथा" या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज संपन्न झाला. या वेळी भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाचे सादरीकरण सुनील जैन, रमेश अगरवाल, कल्ट एंटरटेन्मेन्ट, फीफथ डायमेन्शन व राजतरु स्टुडिओ करत आहेत व चित्रपटाचे निर्मिती सुनील जैन, आदित्य जोशी, अलोक अरबिंद ठाकूर, आदित्य शास्त्री, वेनेसा रॉय यांच्या सहकार्याने होणार आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ज्ञानेश शशिकांत भालेकर करत आहेत. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन सौरभ - दुर्गेश करणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण राजेश नदोने करणार असून कलादिग्दर्शक म्हणून राजू मारुती सापटे कार्य करतील.सुप्रसिद्ध कवी गुरू ठाकूर व मंदार चोळकर या चित्रपटाचे गीतकार असणार आहेत तर वेशभूषा सपना यादव करणार आहे. शिवराज छाब्रा ध्वनी दिग्दर्शन करतील. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर चित्रपटाच्या टीमने मुंबई मध्ये चित्रपटाची मुहूर्तमेढ केली.



            या चित्रपटाचे कथानक उमाजी व अंकुश यांच्यातील फुटकळ वादावर आधारीत आहे… उमाजी आणि अंकुश एकाच गावात राहणारे बागायतदार… पण यांच्यात परंपरागत चालत आलेलं वैर… त्यामुळे एकमेकांना पाण्यात बघणं आलंच…



 पण अशातच जर उमाजीचा मुलगा आदित्य आणि अंकुशची मुलगी ओवी एकमेकांच्या प्रेमात पडतात,  आणि मग जी परिस्थिती निर्माण होते याचा विचार न केलेला बरा…





 पण खरी गोची पुढे होते...याच वेळी उमाजीची म्हैस चम्प्या अंकुशच्या रेड्यापासून, धोंडीपासून अनवधानाने गाभण रहाते आणि मग सुरु होतो खरा गोंधळ... दोन बापांचा आढमुठेपणा आणि त्यात होणारी दोन प्रेमी मुलांची होरपळ...आणि मग दोन प्रेमात पडलेल्या मुलांचे धोंडी आणि चम्प्याला भेटवायचे प्रयत्न… या सगळ्या केविलवाण्या प्रयत्नात मुलं कश्याप्रकारे यशस्वी होतात हे बघणं प्रेक्षकांसाठी एक विनोदी मेजवानी ठरेल.

Pradnya Shetty

Prem Jhangiani



PR & Media

Friends In Corporate
















No comments: