सांगीतिक मेजवानी असलेला रोमँटिक चित्रपट 'झिंग प्रेमाची'
२९ जून २०१८ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित !

विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 'झिंग प्रेमाची' या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनीव्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्या अंतर्गत. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले असून त्यांचं 'झिंग प्रेमाची' चित्रपटातून मराठीदिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. या चित्रपटात संगीताचे बरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे व गीतं विजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत.
चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफ़ी सॉंग येणाऱ्या रमजान ईद मुळे अजूनच खास झालंय. या चित्रपटातील गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, ऋषिका सावंत, राजा हसन, महेश मटकर,कुणाल गांजावाला आणि कीर्ती किल्लेदार अशा तयारीच्या गळ्यांचा आवाज लाभलाय. नुकताच, ९ जून २०१८ ला, या चित्रपटाच्या संगीत अनावरणाचा सोहळा थाटामाटात पार पडला.
या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. जगातील सातआश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महाल ला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी या चित्रपटातील प्रेमींवर गाणं चित्रित झाल्यामुळे 'झिंग प्रेमाची' सिनेमामध्ये रोमान्स ची उच्चअनुभूती अनुभवायला मिळणार आहे.
'झिंग प्रेमाची' चे डीओपी आहेत जय नंदन कुमार. कोरिओग्राफी केली आहे राजेश राणे व प्रितपाल गिल (माँटी) यांनी तर साऊंड डिझाइनर आहेत शैलेश सपकाळ. संकलनाची जबाबदारी सांभाळलीयउमाशंकर मिश्रा (विकी) यांनी आणि रियाझ बलूच एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर आहेत. कला दिग्दर्शनाची मोहम्मद नासिर (शेरा) यांनी, हेयर स्टाइलिंगची सईदा शेख व जयश्री कात्रे तर रंगभूषेचीप्रेमकांत उपाध्याय (श्रीकांत) यांनी जबाबदारी सांभाळलीय.
या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहेत. त्यांच्यासोबत अमोल चौधरी, रतन सोमवरे व अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करीतअसून त्यांना रंजीत जोग, स्मिता पवार, मोहक कंसारा, मृणालिनी जांभळे, जयराम शाहू, विपुल देशपांडे, पोपटराव चव्हाण, दिपज्योती नाईक, स्मृती पाटकर आणि गणेश यादव यांच्या महत्वपूर्णभूमिका आहेत.

Thanks & Warm Regards,
Amey Amberkar | Pratham PR
Direct No: +91 9930985166
No comments:
Post a Comment