Monday, July 15, 2024

Post

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच राजकारणात फक्त रस असून चालत नाही, तर समाजभान असणं गरजेचं असतं. समाजासाठी उभा राहिलेल्या एका तरुण कार्यकर्त्याच्या भोवती फिरणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा १५ जुलै २०२४ रोजी सोशल मीडियावर पोस्टर लॉंच झाला आहे. पोस्टर सोशल मिडियावर तरूणांना आकर्षित करत असून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. प्रकाश फिल्म्स प्रस्तुत ‘युवानेता’ चित्रपट योगेश रमेश जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. राजू राठोड आणि जगदीश कुमावत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये लाखोंच्या संख्येत असणारा समाज रस्त्यावर उतरला आहे. हातात झेंडे घेऊन जणू झोपलेल्या प्रस्थापितांना जागं करण्यासाठी मोर्चा निघालेला आहे. तळागाळातून आलेला एक तरुण हात उंचावून संपूर्ण समाजाचं नेतृत्व करताना दिसत आहे. ‘सभेत सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता की युवानेता?’ असा प्रश्न करून पोस्टरने चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता वाढवली आहे.

No comments: