Wednesday, January 22, 2025

LILAVATI HOSPITAL AND RESEARCH CENTRE

LILAVATI HOSPITAL AND RESEARCH CENTRE लीलावती हॉस्पिटलचा नवा उपक्रम, जागतिक दर्जाच्या मेयो क्लिनिकच्या सहकार्याने कर्करोगावर विशेष उपचार केंद्राची स्थापना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेयो क्लिनिक सोबत लीलावती हॉस्पिटलचा सामंजस्य करार, ३०० बेडचे अद्ययावत केंद्राची उभारणी * कर्करोगावर अत्याधुनिक नव्या तंत्रज्ञानाने उपचार, ऑन्कोलॉजीमधील जागतिक संर्वोतम उपचार उपलब्ध होणार * उच्च गुणवतेच्या उपचारांमुळे रुग्णाना उपचारांसाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही. ज्यामुळे वेळ आणि खर्च वाचणार... जलद आणि अचूक निदान होणार * या नव्या संस्थेमुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या एकूण विकासात योगदान..अत्याधुनिक एआय- तंत्र ज्ञान निर्मित नव्या आरोग्य उपकरणांची निर्मिती होणार *मेयो च्या सहकार्यामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रात नर्सना कर्करोगासंदर्भात अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार, लीलावती हॉस्पिटल द्वारे जनजागृती उपक्रमही राबविण्यात येणार * लीलावती हॉस्पिटलचे स्थायी विश्वस्त श्री. राजेश मेहता आणि म्हणाले की, "आम्हाला ही अत्याधुनिक कर्करोग सेवा संस्था मुंबईत आणताना आणि आमच्या नर्सिंग कर्मचाऱ्याऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी मेयो क्लिनिकशी सहयोग करताना खूप आनंद होत आहे. हा उपक्रम जागतिक दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याची आणि रुग्णांचे आणि समाजाचे जीवन सुधारण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करतो." लीलावती हॉस्पिटल कडून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम देशातला पहिला उपक्रम आहे. लीलावती ट्रस्ट नेहमी लोकसेवा आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न करत असते. माझी आई आणि लीलावती ट्रस्टच्या founder ट्रस्टी चारूबेन मेहता यांचा वारसा चालवण्याचा आमचा आटोकाट प्रयत्न असतो. त्यामुळेच जागतिक दर्जाचे मेयो क्लिनिक सोबत कर्करोगावर आम्ही काम करत आहोत. आम्ही नर्सिंग प्रशिक्षण देऊन उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अवलंबून रुग्णांना सेवा देऊ इच्छितो. आम्ही ३०० बेडचे नवे हॉस्पिटल उभारण्याचा मानस केला असून हे उभारण्यासाठी उचित जागा आम्हाला द्यावी जेने जन सेनेचे हे कार्य अविरत सुरू राहील..

No comments: