Tuesday, July 24, 2018
New post
कृपया प्रसिद्धीसाठी
गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव
मुंबई : गुरूपौर्णिमा उत्सव देशभरात सर्वत्र साजरा केला जातो. गुरू हा शब्द शिक्षक या अर्थाने योजला जातो. जो आपल्या शिष्याला हवे ते ज्ञान देतो तो गुरू. या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तो गुरूपौर्णिमा. मुंबईस्थित संगीतांजलीच्यावतीने गुरूपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. यंदाचे या महोत्सवाचे हे २१ वे वर्ष आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय गायक अनुरतन राय, उपशास्त्रीय गायन अनुरिता राय आिण नटवारी कथ्थक नृत्य श्रीया पोपट हे कलावंत सहभागी हाेणार आहेत. आपले गुरू आचार्य पंडित अनुपम राय यांच्या प्रती त्यांचे शिष्य कार्यक्रम सादरीकरणातून कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. जुहू येथील इस्काॅन सभागृहात २१ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संगीतांजली मुंबई या संस्थेतर्फे संगीत आिण नृत्याचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात. संगीततज्ज्ञ पंडित अनुपम राय यांनी १९७७ साली संगीतांजली संस्थेची स्थापना अलाहाबाद येथे केली. १९८९ साली ही संस्था मुंबई येथे स्थानांतरित झाली आहे. शास्त्रीय आिण उपशास्त्रीय गायन आिण नृत्याचे कार्यक्रम या संस्थेतर्फे अायोजित केले जातात.
No comments:
Post a Comment