Tuesday, June 26, 2018

New post

हलक्याफुलक्या ‘मोल’ सिनेमाच्या ध्वनिमुद्रिकांचे दणक्यात प्रकाशन


निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या हलक्याफुलक्या सिनेमाची निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा. आपल्या मूळ भाषेत एक तरी चित्रपट असावा या ध्यासातून योगेश कुलकर्णी यांनी हा सिनेमा बनवला आहे. नुकताच या चित्रपटाच्या ध्वनीमुद्रिकांचे प्रकाशन राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यशवंत चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह चाळीसगावचे आमदार उन्मेषदादा पाटील, जळगावचे महापौर ललित कोल्हे, अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हेही उपस्थित होते.

या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण स्थानिक खान्देशातील जवळपास ५० अभिनेत्यांनाही यात संधी देण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन योगेश कुलकर्णी यांनीच केले आहे. व्यसनमुक्तीवर आधारलेल्या या सिनेमात योगेश कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शीतल अहिरराव, किशोर कदम, नीला पाटील-गोखले, मिलिंद शिंदे, नलिनी कुलकर्णी, रमाकांत देसले, संजय भदाणे, अनिल मोरे आणि राजन पवार यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळतील.

या सिनेमाचे संगीत अविनाश-विश्वजीत आणि श्याम क्षीरसागर यांनी दिलेले असून यात बहिणाबाई चौधरी, विठ्ठल वाघ, अनिल अवचट, कमलाकर देसले, अश्विनी शेंडे, योगेश कुलकर्णी आणि राजन पवार यांनी गीते लिहिली आहेत. पार्श्वसंगीत अविनाश लोहार, संकलन विजय खोचीकर यांनी केले आहे. पटकथा योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेली असून संवाद योगेश कुलकर्णी यांनी प्रदीप कंखरे यांच्या साथीने लिहिले आहेत.





--
Thanks & Regards


Wasim Siddique

Fame Media

Andheri- West
Mumbai- 400 053

Cell :09892222175





--
Thanks & Regards


Wasim Siddique

Fame Media

Andheri- West

No comments:

Post a Comment